या सुंदर एकांतात

या सुंदर एकांतात
तो दूर तारा लुकलुकताना -
आज किती छान आहे ही हवा
जी माझ्या अस्तित्त्वाला स्पर्शून जात आहे
माझ्या मनोविश्वाच्या चरचरालाही -
अशीच एक कोमल झुळुक झेलते आहे
श्वासाहून काही दूर,
त्यातही एक सुंदर जाणीव,
स्पंदनांनी स्पर्शीलेलं अस्तित्त्व आहे.
करायचं आहे काही तरी
कशाला!? कुणाला!?
नसलेल्या अर्थाला

- रोहन जगताप

0 comments:

 
© 2008 *By Templates*