जीवनापलिकडे

एकदा आई म्हणाली मला,
‘सोन्यासारखे दिवस दवडू नकोस’
सोनेरी सुर्यकिरणांत उजळून निघणारे दिवस

आणि पुढे ती म्हणाली,
‘खूप खूप मोठ्ठा होऽ’
तिची माझ्यावरील मोठ्ठी माया

पण मला जाणायचं आहे,
‘या जीवनापलिकडे काय आहे?’
सोनेरी दिवस आणि आईची माया...

एकदा ऎकलं मी भाषणात,
‘... किर्तीरुपी उरावे’
चिरकाल स्मृतींवरील प्रवास

आणी ‘ते’ म्हणाले,
‘...शांततेनं राहावे’
शांतता या जीवनातली...

पण मला जाणायचं आहे,
‘या जीवनापलिकडे काय आहे?’
चिरकाल स्मृती की खरी शांतता...

‘मी जाणतो’ या नावाने ही कविता याआधी लिहिली होती, पण त्या कवितेत आता बरेच बदल केले आहेत.
 - रोहन जगताप

0 comments:

 
© 2008 *By Templates*