मी चाललो होतो फिरायला
आणि त्या निमित्ताने काही आणायला
दिवस होता सुंदर नि-
अगदी ‘तसंच’ काहीसं मनात
छानसा रस्ता सजलेला, हिरव्या बाजूंनी
फुलपाखरे खेळत होती, भोवताली रंगांनी
एवढ्यात एक छोटेसे फुलपाखरु,
गेले माझ्या भोवताली बागडून
हंऽ कदाचीत त्यावेळी-
माझं मनच गेलं होतं फुलून
ऎकू येत होती सळसळ पानांची
लागली होती थंड, चाहूल वार्याची
वार्याचा झोत गेला स्पर्शून सर्वस्वाला
नी मी भोवताली अनुभवली
मनात हेलावत्या पानांची रिमझिम
कवी - रोहन जगताप
रिमझिम
कवी * Rohan Jagtap
Labels: marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, मराठी कविता, रिमझिम, रोहन जगताप
Subscribe to:
Post Comments (Atom)


0 comments:
Post a Comment