“मनात राहिलं मन एक” ला पहिले १०० सब्स्क्राईबर्स मिळायला १ वर्ष २ महिने लागेल! आणि त्यानंतरचे १०० मिळायाला किती वेळ लागला असेल!? फक्त ३ महिने! म्हणजेच मनात राहिलं मन एक चे आता २०० हून अधिक सब्स्क्राईबर्स झाले आहेत. मनोविश्व टुलबारचे २२९ डाऊनलोड्स झाले आहेत. सर्व सर्व रसिक वाचकांचा मी अगदी मनापासून आभारी आहे! आपलं प्रेम असंच माझ्यावर राहू द्या! या लिंकवर माझी ऑर्कुट कम्युनिटी आहे. त्या कम्युनिटीचे सभासद तुम्ही होऊ शकता किंवा मला मित्र म्हणून ऍड करु शकता. ‘मनात राहिलं मन एक’ चे सध्या १० फॉलोअर्स आहेत, तुम्हीही त्यांपॆकी एक होऊ शकता.
आता खाली मी जी कविता लिहित आहे, ती माझ्या खूप जवळची आहे आणि मला स्वतःला खूप आवडते.
आज रहायचं आहे असं
जसं उद्या जायचं नाही कुठं
तुझ्याबरोबर माझ्यासाठी
आज झोपायचं आहे असं
जसं उद्या ना! नाही उठायचं
स्वप्नांमध्येच पाहण्यासाठी
आज क्षणाला पकडायचंय असं
समजून ते शक्य आहे तसं
पुन्हा पुन्हा तो जगण्यासाठी
आज आवरायचं आहे असं
जसं उद्या नाही परतायचं
तुझा माझा पसारा पाहण्यासाठी
Copyright © 2010 रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षीत!
आज
कवी * Rohan Jagtap
Labels: prem kavita, Rohan Jagtap, आज, कविता, प्रेम कविता, मराठी कविता, मराठी प्रेम कविता, रोहन जगताप
Subscribe to:
Post Comments (Atom)


0 comments:
Post a Comment