दिवास्वप्न

अवकाशातून स्वर्ग गाठतो
मग स्वतःलाच तेथून ढकलून देतो
आपल्याला झेलणारं कोणीच नाही
या जाणिवेतूनच पॅराशूट उघडतो

वाळवंटात पाण्यामागे धावत सुटतो
भुगोलातील मृगजळही समजून चुकतो
आसपास कोणी नसल्याची करुन खात्री
मग ते मृगजळही पिऊन टाकतो

Copyright © 2010 रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षीत!

0 comments:

 
© 2008 *By Templates*