मी माझ्या आत

अनंतशा पसार्‍यात
मी माझ्या मनात

चालत चालत चाललोय
विश्व सभोवताली
केंद्रबिंदू मी, माझ्यासाठी

चक्रव्यूहात शिरला
अभिमन्यू जसा
त्याच्यासारखंच लढत आहे
एकाचवेळी अनेकांशी

जाणिवेपलिकडे पहात
मी माझ्या ‘आत’
त्यातच आहे आनंद समाधानाचा
काहीच नाही, सर्व असतानाही...

Copyright © 2010 रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षीत!

2 comments:

pinky said...

your poem is so nice,it touches my heart.

रोहन जगताप said...

Thanks Pinky!!! :-)

 
© 2008 *By Templates*