शोधत आपली दिशा

अनेक नजरात
अनेक मनात
मी वेगवेगळा किती!
बदलांच्या ह्या धरतीवर
मी रुपांत नेमका किती!

कुणाकुणाला कशीकशी
माझी प्रतिमा भासे!?
स्वतः मजला माझी
अस्पष्ट आकृती दिसे

जीवनाच्या अगम्यतेत
मी स्वतःस ओळखू कसा?
तो मीच खरा आहे का?
जो हा दाखवतोय आरसा

जिथेजिथे असेन मी
उमटविला माझा ठसा
भटकातेहेत ते सर्वही आता
शोधता आपली दिशा

Copyright © 2010 रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षीत!

0 comments:

 
© 2008 *By Templates*