त्या गडगडाटात टाळ्यांच्या
माझी डळमळीत टाळी ही
तिचा आवाज मी आणि आसपास
कुणीही ऐकला नाही
असंख्य हात असले जरी
या इतक्या विशाल जगात
पण माझ्यासाठी ना कधी
एक टाळी वाजली नाही
या न थांबणारया वेळेनं
मला अनंत संधी दिली
कधी विचार मी केला नाही
कधी कॄती ती झाली नाही
आवलोकन करतोय म्हटलं
विश्लेशण करतोय म्हटलं
ऎकताना हॄदयाचे ठोके
सेकंद काटा ऐकला नाही
जागा पटकाविण्यासाठी
या ‘मी’ म्हणणारया गर्दीत
मी कुणास ढकलले नाही
त्यातून बाहेरही पडलो नाही
काळाने विचारलेल्या प्रश्नांना
मी डळमळीत उत्तरे दिली
पण कधी आभ्यास केला नाही
‘करू’ म्हणणंही सोडलं नाही
कधी मलाच आलेले उत्तर
उभा राहून देऊ शकलो नाही
कधी मनात आलीच शंका
तर मी प्रश्न विचारला नाही
एकमेकांवर माझे हात
स्वतःसाठी आदळले नाही
मी स्वतः स्वतःला कधी
सुंदर भेटही दिली नाही
Copyright © 2010 रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षीत!
माझी टाळी
कवी * Rohan Jagtap
Labels: marathi, marathi kavita, marathi poem, Rohan Jagtap, मराठी, मराठी कविता, माझी टाळी, रोहन जगताप
Subscribe to:
Post Comments (Atom)


0 comments:
Post a Comment