इथून दूरवर

सभोवतालच्या मंद प्रकाशातून
या अशा थंड हवेत
निवांत रस्त्यावरुन
एकटंच चालताना

वाटेवरील एक छोटासा दगड
मारला मी पायाने
तो ठेचकाळत गेला पुढे
जमिनीशी अंतराने

माझं मन ही
विरघळलं त्यात
ते मला सोडून
हरवलं कशात?

लागली ही ठेच
मनाला कशाची?
कोणत्या भावना त्यास
सोडताहेत दूर आकाशी?

जोडू नकोस तू त्यास
असं मनास
ठेच लागली भावनांची
जरी या जीवनास

जग आहेस तसा
स्थिर दगाडातून
इथून दूरवर
सर्वांपासून

Copyright © 2010 रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षीत!

0 comments:

 
© 2008 *By Templates*