सुंदर रंगसंगती

मनाच्या एका कोपर्‍यात
माहित आहे तुला
या आयुष्यात तू
सुटलेला एक बाण

इतकीच जाणिव
की अशातशा
जगण्यामध्ये
जीवंत तू आहेस

त्यात रोजच्याच
काही गोष्टी
नेहमीच्याच, अनंत प्रकारच्या
सुखदुःखाच्या

‘हे’ रंग आयुष्याचे
भरावेच लागणार जीवनात

पण सुंदर सजेल हे जीवन
जेंव्हा निवडशील
मनापासून
एक सुंदर रंगसंगती
स्वतःसाठी

Copyright © 2010 रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षीत!

0 comments:

 
© 2008 *By Templates*