एक चांगला दिवस

( आकार दूर जात आहे
त्याला तसाच राहू दे
आणि शेवटी हळूवार
निघून जाऊ दे )

जेंव्हा मी पाहिलं
आकाश खाली येऊन
स्पर्श करताना

पण ती माझी कल्पनाच होती
आणि देवाची कल्पकता

आभासही सत्यात पसरले
मन आत्म्यात उतरले
हजारो क्षण प्रतिक्षेत थांबले
फक्त एका क्षणातले

एक चांगला दिवस
आणि सारंच काही छान होईल
जे काल नाही ते आज होईल
ईतिहास नव्याने लिहिला जाईल
आजच्या क्षणातून चिरकालात

आपण स्मृतीत हरवून जाऊ शकतो
स्मृती हरवू शकत नाही
पण आता तू हरवू नकोस
आणि दूर जाऊ नकोस

कोणीच नसलेला
फक्त असलेला
हवंस त्याला जाणायला
माग तुटता तारा
तू मनोविश्वातला

एक चांगला दिवस
आणि सारंच काही छान होईल
जे काल नाही ते आज होईल
ईतिहास नव्याने लिहिला जाईल
आजच्या क्षणातून चिरकालात

No comments:

Post a Comment